Monday, March 9, 2026

Dainik Bhaskar sign off with a win


BRIEF SCORES
Tarun Bharat 138-4 in 20 overs (Dinesh Borkar 33, Anil Kamble 30, Sujan masid 13-2, Shrikant Bhalerao 2-17, Rahul Singh Thakur 1-25)
lost to Dainik Bhaskar 137-4 in 16.2 overs (Rahul Singh Thakur 52, Dnyneshwar Pal 52, Anil Kamble 2-23) by six wickets. 






नितीन पटारियाचे धुवाधार अर्धशतक 

 आंतरप्रेस टी-२० क्रिकेट : 'सकाळ'च्या नितीन बैतुलेची खेळी व्यर्थ


नागपूर, ता. ७ : सामनावीर नितीन पटारियाच्या धुवाधार अर्धशतकाच्या जोरावर गतविजेत्या लोकमत संघाने स्पोर्ट्स जर्नालिस्ट असोसिएशन ऑफ नागपूर (एसजेएएन) तर्फे आयोजित २५ व्या आंतरप्रेस टी-२० क्रिकेट स्पर्धेतील शेवटच्या साखळी सामन्यात दैनिक 'सकाळ'चा ४४ धावांनी पराभव करून लागोपाठ चौथा विजय नोंदविला. 
वसंतनगर मैदानावर शुक्रवारी झालेला हा सामना ओलसर खेळपट्टीमुळे प्रत्येकी १० षटकांचा खेळविण्यात आला. 'सकाळ'ने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या लोकमतने निर्धारित १० षटकांत ४ बाद १३६ अशी मजबूत धावसंख्या उभारली. पटारियाने नऊ चौकार व सात षटकारांच्या मदतीने अवघ्या ३९ चेंडूंत ९४ धावा ठोकल्या. तर नितीन श्रीवासने १५ व सारंग वलवटकरने १२ धावांचे योगदान दिले. 'सकाळ'कडून सचिन बेलवलकरने दोन व कर्णधार अविष्कार देशमुखने एक गडी बाद केला. 

विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना 'सकाळ'चा संघ १० षटकांत ७ बाद ९२ धावांपर्यंतच मजल मारू शकला. नितीन बैतुलेने सर्वाधिक ४४ धावा (१९ चेंडू, ४ चौकार, ३ षटकार) केल्या. याशिवाय अमित रोशनखेडेने १४ व अविष्कारने ११ धावा काढल्या. लोकमतकडून देवेंद्र सदावर्तीने २६ धावांत तीन आणि शरद मिश्राने २२ धावांत दोन बळी टिपले. पटारियाने एक गडी बाद केला. 'मॅचविनिंग' खेळी केल्याबद्दल पटारियाला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. रविवारी (ता. ८) दैनिक 'भास्कर' आणि तरुण भारत यांच्यात शेवटचा साखळी सामना खेळला जाणार आहे.









 

No comments: