Tuesday, August 30, 2022
Thakur wins penalty shoot out contest
Sports Journalists’ Association of Nagpur (SJAN) celebrated National Sports Day on the occasion of birth anniversary of hockey wizard Major Dhyanchand at Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur University ground on Monday.
A penalty shoot-out competition was organised on the occasion in which Rahul Thakur of ‘Dainik Bhaskar’ emerged winner while Ninad Bhonde of ‘Lokmat’ finished runners up. Paritosh Pramanik and Anupam Soni of ‘The Hitavada’ were the semi-finalists.
Prof Atmaram Pande of Big Ben Football Club and senior journalist and SJAN founder member Dharmendra Jore distributed the prizes.
SJAN president Dr Ram Thakur and Secretary Paritosh Pramanik welcomed the guests. Naresh Shelke conducted the programme and also proposed a vote of thanks.
Saturday, August 13, 2022
‘Great experience. India should hold more international events’
NAGPUR, Aug 13, 2022
Terming representing the country in India’s maiden Chess Olympiad that concluded in Chennai recently as a “Great experience”, the city duo of Grandmaster Raunak Sadhwani and Woman Grandmaster Divya Deshmukh craved for more such events to be staged by the nation.
Raunak and Divya, who were part of the Indian chess teams that participated in the 44th edition of Chess Olympiad, opened up during a Meet The Press function organised by Sports Journalists’ Association of Nagpur in their office on Saturday.
“It was a great atmosphere there and I am glad that I was part of it. Though this was not for the first time that I played for India, it was still a great experience. There was a bit of extra pressure to perform initially but as the event progressed, we all felt comfortable,” said Divya, who won the best fifth board award in the tournament, in her opening remark.
Raunak, who was part of the India B team that clinched a historic bronze medal in the competition, said, “It was great tournament and I am happy that I could deliver. I would love to see India hosting more such events in future. Public’s response to the event was huge and I hope that it does not die off.”
One thing that came out in the open was the mental toughness of the players at such a young age. Both the players were free and frank while making their opinions. The youngsters claimed that they don’t do anything special like yoga or meditation for mental toughness.
“I have never utilised the services of any mental trainer. I keep focus on playing more and more chess. Yes, for physical fitness, I hit gym or play cricket (bowl four overs),” said Raunak.
“Mental toughness is one thing you learn in due course. It comes naturally after you play continuously at a higher level. I find no need of any mental fitness trainer,” added a confident Divya.
Both praised the role of Indian team mentor and multiple time world champion Viswanathan Anand.
“Vishy Sir is very supportive. He is always positive and stands with firmly you even if you lose. His classes also helped during the tourney. Before the event, he was explaining to us few games that he could not finish off with a win. I found myself in the same situation in one of my games and recollected from his talk and won that match,” recalled Raunak with a smile on his face.
At the outset, SJAN President Dr Ram Thakur and Secretary Paritosh Pramanik welcomed Divya and Raunak.
Divya’s grandmother and parents Dr Jitendra and Dr Namrata and parents of Raunak — Bharat and Heena were also present on the occasion.
Naresh Shelke conducted the proceedings and proposed a vote of thanks.
---------------------------------------
भारतात आणखी आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा व्हाव्यात
रौनक साधवानी आणि दिव्या देशमुख यांनी ‘शेअर' केले चेस ऑलिंपियाडमधील अनुभव
नागपूर, ता. १३ ः चेन्नई येथे नुकत्याच झालेल्या चेस ऑलिंपियाडमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करताना नागपूरच्या ग्रँडमास्टर रौनक साधवानी आणि महिला ग्रँडमास्टर दिव्या देशमुख यांनी जबरदस्त कामगिरी करताना ब्राँझपदकाची कमाई केली. नागपुरात परत आल्यावर स्पोर्ट्स जर्नालिस्ट असोसिएशन ऑफ नागपूरतर्फे आयोजित ‘मीट दी प्रेस' कार्यक्रमात त्यांनी आपले अनुभव शेअर केले. अशा उच्च दर्जाच्या किंवा ऑलिंपियाडचे भारतात नियमितपणे आयोजन व्हावे, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
राष्ट्रीय विजेती असलेली दिव्या म्हणाली, स्पर्धा अतिशय उत्तमरीत्या आयोजित करण्यात आली होती. भारतीय संघाकडून खेळण्याची ही माझी पहिली वेळ नसली तरी स्पर्धा भारतात असल्याने वेगळाच अनुभव होता. त्यात पाचव्या बोर्डवर वैयक्तिक ब्राँझपदक जिंकल्याचा आनंद वेगळा आहे. भारतात
आंतरराष्ट्रीय स्पर्धा होतात, पण नियमितपणे ऑलिंपियाड किंवा अशा उच्च दर्जाच्या स्पर्धा आयोजित केल्यास त्याचा फायदा खेळाडूंना होऊ शकेल. दिव्याने स्पर्धेत नऊ पैकी सात गुण प्राप्त केले. तिच्या संघाला एकूण आठवे स्थान मिळाले. विश्वनाथन आनंद यांचा सहवास किंवा त्यांचा अनुभव हा नेहमीच प्रेरणादायी असतो, असेही दिव्या म्हणाली. स्पर्धेतील शेवटची एकूणच विचारत करता थोडी तणावपूर्ण होती. कारण लढत सकाळी होती आणि वैयक्तिक कामगिरीसोबत संघासाठी जिंकायचेही होते. त्यामुळे ती लढत थोडी अवघड गेल्याचे तिने सांगितले.
पदक जिंकल्याचा आनंद - रौनक
रौनक साधवानीचा खुल्या गटातील इंडिया-२ संघात समावेश होता. या संघाने ब्राँझपदक जिंकले. त्यात रौनकने ८ पैकी साडे पाच गुणांचे योगदान दिले. तो म्हणाला, पदक जिंकल्याचा निश्चितच आनंद आहे. स्पर्धा भारतात होत असल्याने एक वेगळा अनुभव होता. यानिमित्ताने क्रीडा ज्योतही काढण्यात आली. त्यात क्रीडा प्रेमींचा उत्साह पाहण्यासारखा होता. मात्र, याचा माझ्या खेळावर काहीही परिणाम झाला नाही. मी माझा नैसर्गिक खेळ केला. भारतात पुरस्कर्ते पुढे आल्यास अशा प्रकारच्या जागतिक पातळीवरील स्पर्धा आयोजित करण्यास अडचण येणार नाही, असे मत रौनकने व्यक्त केले. विश्वनाथन आनंद यांच्या मागदर्शनाचा मला एका लढती दरम्यान फायदा झाल्याचे त्याने आवर्जून सांगितले. अझरबैझानविरुद्धच्या खेळाडूविरुद्धची लढत सर्वात कठीण होती, असे सांगून तो म्हणाला, त्यात माझी बाजू वरचढ होती. तरीही मी जिंकू शकलो नाही. त्यामुळे काहीसा तणावाखाली होतो. त्यापूर्वी एसजेएएनचे अध्यक्ष राम ठाकूर आणि सचिव पारितोष प्रामाणिक यांनी अनुक्रमे दिव्या व रौनकचे स्वागत केले. यावेळी दिव्या व रौनकचे आई-वडील उपस्थित होते.
अनुभवातूनच मानसिक कणखरता वाढते
बुद्धिबळ या खेळात प्रचंड मानसिक कणखरता लागते, ती कशी वाढविता किंवा त्यासाठी काय करता असे विचारल्यावर रौनक म्हणाला, मी माझ्या ‘चेस' वर जास्त लक्ष केंद्रित करतो. याशिवाय शारीरिक तंदुरुस्तीवर विशेष लक्ष देतो. मानसिक कणखरता ही अनुभवाने, परिपक्वतेनुसार किंवा काळानुसार येत असते असे माझे मत आहे. यास दिव्यानेही दुजोरा दिला.