Sunday, July 2, 2017

Media Badminton Held






जैन, चव्हाण विजेते

-एसजेएएन मिडिया बॅडमिंटन स्पर्धा
May 22, 2017......

नागपूर, अत्यंत अटीटतटीच्या सामन्यात सुहास नायसेवर मात करीत गतविजेत्या आशिष जैनने एसजेएएन-गायकवाड पाटील इंटरनॅशनल स्कूल मीडिया बॅडमिंटन स्पर्धेतील पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले. महिला एकेरीमध्ये राखी चव्हाण, पुरुष दुहेरीमध्ये सुहास नायसे-फक्रुद्दीन बोहरा तर मिश्र दुहेरीमध्ये आशिष जैन-प्रज्ञा बॅनर्जी अजिंक्य ठरले.

स्पोर्टस् जर्नालिस्टस् असोसिएशन ऑफ नागपूर (एसजेएएन) आणि धनवटे नॅशनल कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

धनवटे नॅशनल कॉलेजच्या इन्डोअर स्टेडियममध्ये झालेला आशिष जैन आणि सुहास नायसे यांच्यातील सामना रोमांचक ठरला. पहिल्या सेटमध्ये पराभूत झाल्यानंतर गतविजेत्या आशिष जैनने दमदार पुनरागमन करीत उर्वरीत दोन सेटमध्ये विजय मिळवून विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. आशिष जैनचे हे एसजेएएन मीडिया बॅडमिंटन स्पर्धेतील सलग दुसरे विजेतेपद ठरले. तत्पूर्वी, उपांत्य फेरीच्या सामन्यात तिसऱ्या मानांकित सुजन मसीदविरुद्ध चांगलाच संघर्ष करावा लागला. मात्र, सरस खेळ करत जैनने मसीदला पराभूत केले. दुसऱ्या उपांत्य सामन्यात सुहास नायसेने फक्रुद्दीन बोहराला नमवले.

महिला एकेरीच्या सामन्यात राखी चव्हाणने पूजा लोहेचा सहज पराभव करीत विजेतेपदावर नाव कोरले. पुरुष दुहेरीमध्ये सुहास नायसे-फक्रुद्दीन बोहरा जोडीने आशिष जैन-रविराज अंबडवार यांचा तीन सेटमध्ये पराभव केला. तर मिश्र दुहेरीमध्ये आशिष जैन-प्रज्ञा बॅनर्जी जोडीने सुहास नायसे-प्रिती यादव जोडीवर मात केली.

धनवटे नॅशनल कॉलेजचे प्राचार्य डॉ. बबनराव तायवाडे आणि गायकवाड पाटील इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्य शबीह चौरासिया यांच्या प्रमुख उपस्थितीत बक्षीस वितरण पार पडला. यावेळी मंचावर एसजेएएनचे अध्यक्ष किशोर बागडे आणि सचिव संदीप धाबेकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन डॉ. राम ठाकूर यांनी केले.


Results
Men's Singles Final
Ashish Jain beat Suhas Nayse 14-21, 21-17, 21-13.

Men's Singles Semi-finalsAshish Jain beat Sujan Masid 18-21, 21-6, 21-10.
Suhas Nayase beat Fakruddin Bohra 21-12, 21-15

Women's Singles FinalRakhi Chavan beat Pooja Lohe 21-9, 21-14

Men's Doubles FinalS. Nayse-F Bohra beat A. Jain-R Ambadwar 21-14, 15-21, 21-19
Men's Doubles Semi-Finals
S Nayse- F Bohra beat M Sakharwade- S Warrior 21-8, 21-9
A Jain-R Ambadwar beat S Ratnaparkhi- S Wardhane 21-7, 21-12

Mixed Doubles Final
A Jain-P Bajerjee beat S Nayase- P Yadav 21-14, 21-13.



















स्पोर्टस् जर्नालिस्ट्स असोसिएशन ऑफ नागपूर (एसजेएएन) आणि धनवटे नॅशनल कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गायकवाड-पाटील इंटरनॅशनल स्कूल-एसजेएएन मीडिया बॅडमिंटन स्पर्धेला शनिवारपासून सुरुवात झाली. धनवटे नॅशनल कॉलेजच्या इन्डोअर स्टेडियममध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेच्या पहिल्या दिवशी विविध गटातील मानांकित खेळाडूंनी सहज विजय नोंदवले.

पुरुष एकेरीमध्ये तिसऱ्या मानांकित सुजन मसीदने रोशन तांबोळीचा ३३-९ असा पराभव केला. तर चौथ्या मानांकित रविराज अंबडवारने सातव्या मानांकित धर्मेद्र कुमारचा ३०-८ असा आणि आठव्या मानांकित संदीप वर्धने याने आविष्कार देशमुखचा ३०-२१ असा पराभव करीत पुढील फेरीत प्रवेश केला. महिला एकेरीमध्ये द्वितीय मानांकित राखी चव्हाणने दिव्यश्री मुजुमदारवर ३०-११ अशी सहज मात केली. पुरुष दुहेरीमध्ये तृतीय मानांकित सुबोध रत्नपारखी-संदीप वर्धने जोडीने अभिषेक अयंगार-कैलाश कुकरेजा जोडीचा ३०-२४ असा पराभव केला. 

तत्पूर्वी, भारतीय बॅडमिंटन संघाचे सदस्य आणि माजी राष्ट्रीय चॅम्पियन अक्षय देवलकर यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. यावेळी गायकवाड-पाटील ग्रुपचे चेअरमन मोहन गायकवाड, धनवटे नॅशनल कॉलेजचे प्राचार्य डॉ. बबनराव तायवाडे आणि गायकवाड-पाटील इंटरनॅशन स्कूलचे प्राचार्या शबीह चौरासिया, एसजेएएनचे अध्यक्ष किशोर बागडे आणि धनवटे नॅशनल कॉलेजचे क्रीडा विभाग प्रमुख देवेंद्र वानखेडे प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन डॉ. राम ठाकूर यांनी तर आभार प्रदर्शन सुहास नायसे यांनी केले. 










Results
Men's Singles
1. Pravin Lonkar  Bbeat         Rajat Borkar 30-10.
2. Rajesh Sharma  Beat  Shashi Rahate 30-15
3. Rupesh Bhaik  Beat  Unmesh Deshmukh 30-22
4. Pravin Kathane Beat Lalit Patki  30-12
5. Mahesh Sarangi Beat Prashant Nimbarte  30-4
6. Amarjeet Bhosale Beat  Anand Kasture  30-21
7. Ajinkya Dalal          Beat Manish Shrivas  30-27
8. Chandrakant Patil  Beat Sudarshan Sakharkar   30-20
9. Pravin Lonkar Beat  Vinay Pande 30-20
10. Sandeep Wardhane          Beat  Avishkar Deshmukh 30-21
11. Fakruddial Bhohra Beat Wasim Quresh 30-15
12 . Sujan Masid Beat  Roshan Tamboli 30-9
13. Amarjit Bhosale Beat   Vivek Sarkar 22-10
14. Raviraj Ambadwar Beat Dharmendra Kumar   30-8
15. Raviraj Ambadwar  Beat Vaibhav  Ganjapure   17-8
16. Satish Dandare  Beat Ajinkay Dalal  30-16
17. Fakruddin Bohar  Beat Abhishekh Iyengar 30-14

Women's Singles 18. Rakhi Chavan  Beat          Divyashree Mujumdar  30-11
19. Sonali Jichkar Beat Sheha Kathrani 30-29

Mixed Doubles20. S. Ratnaparkhi - S. Jichkar  Beat  R. Ramboli- Pooja Lohe  30-11
21. S. Ratnaparkhi - S. Jichkar  Beat S. Masid - Faujia  30-16
22. R. Ambadwar -Pooja Mahatme  Beat      Sneha K.- Vinay Pande        30-13

Men's Doubles23. Mahesh Sarangi - S. Dandare  Beat  Atul Pande- Lalit Patki  30-12
24. Vilas Tijare- Pravin Kathane        Beat Anupam Soni-Nikhil Diksht 30-12
25. Subodh Ratnaprkhi- Sandeep Wardhane Beat A. Iyengar- K. Kukreja 30-24
26. V. Pande- S Dhabekar Beat          U. Deshmukh-Piyush Patil  30-22

1 comment:

HEALTH CARE said...

We are urgently in need of KlDNEY donors for the sum

of $500,000.00 USD,(3 CRORE INDIA RUPEES) All donors

are to reply via the sum of $500,000.00 USD, Email

for more details: Email: healthc976@gmail.com