Tuesday, January 28, 2014

विको-एसजेएन आंतरप्रेस क्रिकेट स्पर्धा


क्रिकमिडिया स्मरणिकेचे विमोचन

स्पोर्टस् जर्नालिस्टस असोसिएशन ऑफ नागपूरतर्फे आयोजित १६व्या विको-एसजेएन आंतरप्रेस टी-२० क्रिकेट स्पर्धेला आज, बुधवारपासून प्रारंभ होत आहे. डॉ. आंबेडकर महाविद्यालयाच्या मैदानावर होणाऱ्या उद्घाटनाच्या सामन्यात गतविजेत्या लोकमतची लढत सकाळशी होईल तर त्याच वेळी वसंतनगर मैदानावर पुण्यनगरी आणि तरूण भारत यांच्यात सामना रंगेल.
१५ फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेचे उद्घाटन बुधवारी सकाळी ९.०० वाजता, माजी कसोटीपटू प्रशांत वैद्य, मोशन ट्युटोरियल्सचे संचालक प्रमोद वालमांढरे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्य प्राचार्या डॉ. मालती रेड्डी यांच्या प्रमुख उपस्थितीत होईल. हे या स्पर्धेचे १६ वे वर्ष असून नऊ वृत्तपत्रांचे संघ सहभागी झाले आहेत.
गत‌वर्षी उपविजेता राहीलेल्या टाइम्स ऑफ इंडिया संघाची सलामीची लढत गुरूवारी आंबेडकर महाविद्यालयाच्या मैदानावर लोकशाही वार्ताशी होईल.
दरम्यान, मंगळवारी सकाळी विको-एसजेएन आंतरप्रेस टी-२० क्रिकेटस्पर्धेच्या स्मरणिकेचे विमोचन धनवटे नॅशनल कॉलचे प्राचार्य आणि ज्येष्ठ क्रीडा संघटक बबनराव तायवाडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ताजश्री मोटर्सचे संचालक अविनाश भुते आणि मोशन ट्युटोरियल्सचे संचालक प्रमोद वालमांढरे हे ही प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.  
विको लेबोरेटरीज या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक असून मोशन ट्युटोरियल्स सहप्रायोजक आहेत.


No comments: