क्रिक मीडिया' चे उद्या प्रकाशन
नागपूर, ता. 3 ः स्पोर्टस जर्नालिस्ट असोसिएशन ऑफ नागपूरतर्फे आयोजित एसजेएएन-ऑरेंज सिटी हॉस्पिटल 14 व्या आंतरप्रेस क्रिकेट स्पर्धेच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या "क्रिक मीडिया' स्मरणिकेचे प्रकाशन गुरुवार, 5 जानेवारी रोजी होत आहे. टिळक पत्रकार भवनाच्या सभागृहात सकाळी 9.15 वाजता स्टेट बॅंक ऑफ इंडिया नागपूरचे उपमहाव्यवस्थापक जी. के. कन्सल यांच्या हस्ते प्रकाशन होईल. यावेळी सात्त्विक फायनान्शियल्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल ढाके, यश समूहाचे यशवंत केऱ्हळकर, शिवछत्रपती पुरस्कार विजेते गिरीश गदगे उपस्थित राहतील. "क्रिक मीडिया' प्रकाशित करण्याचे यंदा पाचवे वर्ष होय. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व संघातील खेळाडूंनी कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे कळविण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment