Monday, February 26, 2024

Prajwal's all-round show in Sakal victory


Riding on the outstanding performance of captain Nitin Baitule and man-of-the-match Prajwal Harne, Sakal drubbed Tarun Bharat by 162 runs to keep semifinals hope alive in the 24th Ankur Seeds-SJAN Inter- Press Cricket Tournament at Vasant Nagar ground on Monday.

Batting first, Sakal piled up 201 for five in 20 overs. Baitule top scored with 63 whereas Prajwal contributed 38. Pratik Wairagade (36) also batted well. In reply, Tarun Bharat were bundled out for a poor total of 39. Harne bowled well and captured six wickets while Nilesh Doye got three.

Former national carrom player and LIC officer Naval Meshram distributed the man-of-the-match prize to Harne.
--------------


सकाळचा दणदणीत विजय
सकाळ वृत्तसेवा
नागपूर,ता.२६ ः कर्णधार नितीन बैतुलेचे नाबाद अर्धशतक व सामनावीर प्रज्वल हरणेच्या दमदार गोलंदाजीच्या जोरावर सकाळने २४ व्या आंतर प्रेस क्रिकेट स्पर्धेत तरुण भारतवर १६२ धावांनी दणदणीत विजय मिळवला. या विजयामुळे सकाळच्या उपांत्य फेरीत स्थान मिळविण्याच्या आशा उंचावल्या आहेत.
वसंतनगर मैदानावर सकाळने प्रथम फलंदाजी करताना ५ बाद २०१ धावा केल्या. तरुण भारतचा डाव ३९ धावांवर गडगडला. सलामीवीर प्रज्वलने सहा चौकार मारीत ३८ धावा केल्या. नितीन बैतुलेने नाबाद अर्धशतक करून संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली. नितीनने ७ चौकार व २ षटकार खेचत ३५ चेंडूत ६३ धावा केल्या. प्रतीक वैरागडेने तडाखेबंद फलंदाजी करीत १६ चेंडूत ४ चौकार व ३ षटकाराच्या मदतीने ३६ धावा केल्या. तरुण भारतचा संघ केवळ ३९ धावांवर सर्वबाद झाला. प्रज्वल हरणेने सहा गडी टिपण्याची किमया साधली. नीलेश डोयेने ३ गडी बाद केले. माजी राष्ट्रीय कॅरमपटू असलेले नवल मेश्राम यांच्या हस्ते प्रज्वलला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.

 





















 

No comments: