Friday, February 14, 2014

"सकाळ' आज विजेतेपदासाठी खेळणार


स्पोर्टस जर्नालिस्ट असोसिएशन ऑफ नागपूरतर्फे आयोजित सोळाव्या विको-एसजेएएन आंतरप्रेस क्रिकेट स्पर्धेत विजेतेपदासाठी शनिवारी गतविजेता "लोकमत' आणि प्रथमच अंतिम फेरी गाठणारा "सकाळ' संघ आमनेसामने येत आहेत. 
दीक्षाभूमी स्थित आंबेडकर महाविद्यालयाच्या मैदानावर सकाळी साडेनऊ वाजता ही लढत सुरू होईल. दोन्ही संघ जबरदस्त फॉर्मात असल्याने लढत चुरशीची होण्याची शक्‍यता आहे. स्पर्धेच्या सलामी लढतीत "लोकमत'ने "सकाळ'वर मात केली होती; मात्र त्यानंतर जबरदस्त कामगिरीच्या जोरावर "सकाळ'ने अंतिम फेरी गाठली. किशोर जामकर, सुनील ठवकर, पंकज बोरकर, ओम ढाकुलकर यांनी फलंदाजीत उत्तम कामगिरी केली आहे. बोरकर, राजेश व्यवहारे, सचिन बेलवलकर आणि अतिशय संथ गोलंदाजी करणारा धोकादायक अनिल कांबळे यांच्या गोलंदाजीचा प्रतिस्पर्धी संघातील शरद मिश्रा, नितीन पटारिया, अमित खोडके आणि सचिन खडके हे फलंदाज कसा सामना करतात, हा उत्सुकतेचा विषय आहे. अंतिम फेरी गाठण्याची ही लोकमतची ही सातवी वेळ असली तरी यापूर्वी तीनदा त्यांना विजेतेपद मिळविता आले आहे. 
"सकाळ' संघ ः राजेश व्यवहारे (कर्णधार), किशोर जामकर, सुनील ठवकर, पंकज बोरकर, सचिन बेलवलकर, ओम ढाकुलकर, देवेंद्र देशपांडे, स्वप्नील नागपुरे, अनिल कांबळे, चंद्रकांत पुणेकर, तेजस काळमेघ, मनोज मुळे, मकरंद राव, शशांक लालझरे, संजीव शर्मा.

No comments: